महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागामार्फत गट क (भू-करमापक संवर्ग) मध्ये 903 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. राज्यभरातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरतीची माहिती
- भरती करणारा विभाग: भूमि अभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन
- एकूण पदसंख्या: 903 (एकूण रिक्त पदे – 1160, त्यापैकी 903 पदे सरळसेवेने भरली जाणार)
- जाहिरात प्रसिद्ध: सप्टेंबर 2025
- ऑनलाईन अर्ज सुरू: 1 ऑक्टोबर 2025
- शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025
- परीक्षा तारीख: 13 व 14 नोव्हेंबर 2025
विभागनिहाय पदसंख्या
- पुणे विभाग – 83
- कोकण (मुंबई) विभाग – 259
- नाशिक – 124
- छत्रपती संभाजीनगर – 210
- अमरावती – 117
- नागपूर – 110
पात्रता (Eligibility)
- शैक्षणिक पात्रता:
- स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा
- ITI सर्व्हेअर (Surveyor) ट्रेड प्रमाणपत्र
- वयोमर्यादा: शासन नियमांनुसार राखीव व खुल्या वर्गासाठी वेगळी
अर्ज प्रक्रिया
उमेदवारांचे अर्ज खालील अधिकृत संकेतस्थळांवर फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील:
- ibpsreg.ibps.in/gomsep25 (Application Link Open)
- mahabhumi.gov.in
परीक्षा पद्धत (Exam Pattern)
- परीक्षा पद्धत: ऑनलाईन (CBT) – IBPS मार्फत
- परीक्षा तारीख: 13 व 14 नोव्हेंबर 2025
- प्रश्नपत्रिका: अभ्यासक्रम व परीक्षेची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध
महत्वाचे मुद्दे
- राज्यात सध्या भू-करमापक संवर्गातील एकूण 1160 पदे रिक्त आहेत, त्यापैकी 903 पदे या भरतीतून भरण्यात येणार.
- मागील दोन वर्षांत अनेक भू-करमापकांनी अन्य शासकीय नोकरी मिळाल्याने राजीनामे दिले, त्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात भरती होत आहे.
- भरती प्रक्रियेनंतर गुणांच्या आधारे विभागनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
महत्वाच्या लिंक
इच्छक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात नीट वाचावी. अर्जाची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 आहे